क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागलमधील राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत इस्लामपूर अजिंक्य; समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमितच्या स्पर्धेत १४ संघांचा सहभाग

या स्पर्धेत दुसरा क्रमांक श्री स्पोर्ट्स क्लब कुरुंदवाड तर तृतीय क्रमांक पैलवान अमोल बुचडे फाउंडेशन पुणे यांनी पटकाविला.उत्तेजनार्थ संघासाठीचे बक्षिस निपाणीच्या बालवीर स्पोर्ट्सने मिळविले. उत्कृष्ट सेंटर प्लेयर कुरुंदवाडचा आदित्य कडगावे,उत्कृष्ट अटॅकर पुण्याचा प्रीतम खोत तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इस्लामपूरचा राजवैभव भांगर यांना गौरविले.

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राजे विक्रमसिंह घाटगे निमंत्रितांच्या राज्यस्तरीय हॉलीबॉल चषक स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम मंडळ संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.या स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले. राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीरराजे घाटगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण झाले.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक श्री स्पोर्ट्स क्लब कुरुंदवाड तर तृतीय क्रमांक पैलवान अमोल बुचडे फाउंडेशन पुणे यांनी पटकाविला.उत्तेजनार्थ संघासाठीचे बक्षिस निपाणीच्या बालवीर स्पोर्ट्सने मिळविले. उत्कृष्ट सेंटर प्लेयर कुरुंदवाडचा आदित्य कडगावे,उत्कृष्ट अटॅकर पुण्याचा प्रीतम खोत तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इस्लामपूरचा राजवैभव भांगर यांना गौरविले.

कोल्हापूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा झाल्या . सांगली, सातारा, इस्लामपूर, पुणे, कुरुंदवाड,निपाणी, उंब्रज, कागल,निगवे, इंगळी, मुरगुड, लिंगनूर, जयसिंगपूर येथील संघ या स्पर्धेत सहभागी झाले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या धर्तीवर या स्पर्धेचे संयोजन केले आहे. दोन कोर्टवर दिवस-रात्र प्रकाशझोतात या स्पर्धा झाल्या . प्रेक्षकांसाठी स्क्रीनसह सुसज्ज प्रेक्षक गॅलरीसह स्पर्धेचे युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले.

भारतीय हॉलीबॉल महासंघाचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी व जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा झाल्या .

पंच म्हणून महेश शेडबाळे, शहनवाज मोमिन, विनोद रणवरे, योगेश वराळे, कपिल खोत, अनिल देवडकर, दीपक चव्हाण, मारुती काशिद, संजय पाटील, प्रवीण मोरबाळे आदींनी काम पाहिले.

सुनील गायकवाड यांनी सामन्यांचे बहारदार समालोचन केले. अश्विनकुमार नाईक, के.बी.चौगुले,बाळासो जाधव, संजय हजारे ,शिवानंद चौगुले आदींनी संयोजन केले.
यावेळी शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडूंसह हॉलीबॉलप्रेमी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks