ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

आगामी जिल्हा परिषदेला संधी दिल्यास शेणगांवच्या शाहूकालीन शाळेस ५० लाखाचा निधी देऊ : जीवन पाटील

जगभरातल्या ११ प्रसिध्द कंपन्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या धनंजय मुंगळे यांनी व त्यांच्या मुंगळे परिवार यांच्या विशेष प्रयत्नातून कल्पतरू कंन्ट्रक्शन मुंबई यांच्या सीएसआर फंडातून या विद्यालयास सुमारे ४० लाखाची मदत केली.

शेणगांव : 

जिल्हा परिषद सदस्य या नात्याने शेणगांव चे व माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गेल्या पाच वर्षाच्या काळात शेणगाव च्या विविध विकास कामासाठी मी ४५ लाखाचा निधी दिला.आता याही वेळी अशीच संधी दिली तर तुमच्या या एकट्या शाहूकालीन शाळेस ५० लाखाचा निधी देईन.असे आश्वासन या मतदार संघाचे माजी जि प सदस्य जीवन पाटील यांनी दिले.

ते येथील जीवन शिक्षण मंदिर शेणगांव ( ता भुदरगड) या राजर्षि शाहू महाराजांनी बांधलेल्या या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विविध कामांच्या नुतनीकरण प्रसंगी व येथील मुंगळे कुटुंबियांनी शाळेला प्रदान केलेल्या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता बारदेसकर या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होत्या.

यावेळी बोलताना मुंबईस्थीत गावचे सुपुत्र धनंजय मुंगळे म्हणाले कीं १६८ वर्षापुर्वी राजर्षि शाहू महाराजांनी बांधलेल्या शाळेत माझे वडिल नरेंद्र जनार्दन मुंगळे शिकले आणि सुसंस्कृत जीवन जगले यांचा मला सार्थ अभिमान आहे.येणाऱ्या काळात या संस्कार शाळेला आर्थिक पाठबळ देवून अधिक बळकट करू.

या नुतनीकरणाच्या उद्घाटनांतरच येथील जोतिर्लिंग देवालयाच्या संत ज्ञानेश्वर व्यासपीठांवर या पाहुण्यांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी गावच्या विविध क्षेत्रातील मांन्यवर याप्रसंगी उपस्थीत होते.

जगभरातल्या ११ प्रसिध्द कंपन्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या धनंजय मुंगळे यांनी व त्यांच्या मुंगळे परिवार यांच्या विशेष प्रयत्नातून कल्पतरू कंन्ट्रक्शन मुंबई यांच्या सीएसआर फंडातून या विद्यालयास सुमारे ४० लाखाची मदत केली. या कामांचा उद्घाटन सोहळा या कुटुबियांच्या हस्ते आज संपन्न झाला.यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जून आबिटकर सर्व आजी माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने या दातृत्वाच्या मुंगळे कुटुंबियांचा भव्य सत्कार केला.

ज्या शाळेत वडिल शिकले त्या शाळेबध्दल कृतज्ञता व्यक्त करत गावचे कौतूक करणाऱ्या या दाते मुंगळे कुटुंबियांचे माजी लोकनियुक्त सरपंच सुरेश नाईक यांनी आभार मानले.निवृत्त प्राचार्य शंकर शिंदे,नुतन राज्य विक्रीकर सत्कारमुर्ती प्रणव तानाजी सणगर यांनीही शाळा जिर्णोध्दारास मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामस्थ व जेष्ट नागरिक यांनीही मुंगळे कुटुंबियांचा सत्कार केला.शाळेला उत्तम बगीचा करणारे सुनील खैरे व कारागिर यांचा कार्यक्रमाच्या सुरूवातीला सत्कार केला.

राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.दिप प्रज्वलन झाले.नंतर संयोजक मिलिंद ताम्हणकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. अध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सुरेख सुत्रसंचालन केले.यावेळी कामाचा पाठपुरावा करणारे उमेश तेली, मिलिंद मुंगळे, रियाज मगदूम, विलास चोडणकर, दाते कृष्णा भिवा माने, इंजिनिअर ओमकार तेली, उपसरपंच शरद बुवा,सुनिल कापसे, भैरव कुंभार, सर्व ग्रा प सदस्य,गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,जेष्ट नागरिक,शिक्षक वृंद, आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.अध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सुरेख सुत्रसंचालन केले.तर आभार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पा महेश तेली यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks