तंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीस्टीलरीच्या विस्तारीकरणासह खराब धान्यापासून इथेनॉल निर्मिती करणार : समरजितसिंह घाटगे; कारखाना नुकसान सोसणार पण पूरबाधित ऊस अग्रक्रमाने तोडणार

कागल प्रतिनिधी :

दिवसेंदिवस साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून साखरेच्या खपापेक्षा साखरेची निर्मिती जादा होत आहे. त्यामुळे साखर गोडावूनमध्ये पडून राहत आहे. त्यामुळे भविष्यात साखरेस चांगला दर मिळेल अशी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. यासाठी स्पिरीट, इथेनॉल ,सारखे उपपदार्थ निर्मितीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कारखान्याच्य ६० के एल पी डी क्षमतेच्या डिस्टलरी सोबत आणखी १०० के एल पी डी ची अत्याधुनिक डिस्टलरी उभा करण्याचा व्यवस्थापणाचा मानस आहे .

तसेच बिगर गळीत हंगामामध्ये मध्ये खराब धान्यापासून ही इथेनॉल निर्मिती करणेबाबत चे नियोजन चालू आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

शाहू साखर कारखान्याच्या 42 व्या गळीत हंगामासाठीच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते.

यावेळी श्री. घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नवोदिता घाटगे या उभयतांच्या हस्ते विधिवत बॉयलर प्रदीपन केला .
यावेळी व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, युवराज आर्यवीर घाटगे ,व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक यांची उपस्थिती होते.

ते पुढे म्हणाले, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवीत असताना नेहमीच बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत बदलाला सामोरे जाण्याची परंपरा निर्माण केली आहे.
गतवर्षी आपण पहिल्या दिवसापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. त्याचा चांगला फायदा आपल्याला झालेला आहे तसेच भविष्यात तंत्रज्ञानात वेळोवेळी होणारे सर्व बदल आम्ही स्वीकारनार आहोत.

प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मागील गळीत हंगाम 2020- 21 मधील कामकाचा आढावा घेतला.येणारा गळीत हंगाम २०२१-२२ बाबतच्या नियोजनबाबत बोलताना ते म्हणाले,शाहूने १० लाख मे. टन ऊस गाळपाचे तर १२.०० लाख क्विंटल पेक्षा जादा साखर उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच डिस्टलरी मधून १ कोटी ३० लाख लिटर स्पिरिट निर्मिती चे उद्दिष्ट आहे .

त्यापैकी १ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे असून सहवीज प्रकल्पातुन ८.२५ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आज अखेरची आपली वाटचाल पाहता ठरवलेल्या उद्दिष्टपूर्ती पर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनी यांनी केलेल्या सहकार्यामुळे यशस्वी झालेलो आहोत. या गळीत हंगामातसुद्धा ही उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी आपण पिकविलेला व नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले

 

प्रसंगी सभासद, शेतकऱ्यांसाठी नुकसान सोसू

या गळीत हंगामाला प्रारंभ करण्याआधी महापुराचा फार मोठा फटका शेतीला बसला आहे. या पूरबाधित नुकसानग्रस्त क्षेत्राचा पाहणी दौरा आम्ही केला.हा ऊस प्राधान्याने तोडण्यासाठी गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासून ठराविक कोटा देण्याचे आदेश शेती खात्यास दिले आहेत .जेणेकरून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल .या आधीही दोन वर्षांपूर्वी महापुराने नुकसानग्रस्त झालेला 70 हजार मेट्रिक टन ऊस आपल्या कारखान्याने तोडून सभासद शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. या खराब उसामुळे कारखान्याची रिकव्हरी कमी होऊन तोटा होतो.मात्र सभासदांसाठी शेतकऱ्यांसाठी हा तोटा सोसू. पण पुराने नुकसानग्रस्त ऊस कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने तोडू. असे ठाम प्रतिपादन श्री घाटगे यांनी केले.त्याला सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks