ताज्या बातम्याराजकीय

बिद्री ‘ निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; १७३ केंद्रावर उद्या होणार मतदान

बिद्री (प्रतिनिधी / अक्षय घोडके) :

बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. सदर मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी भुदरगड कागल व करवीर या कार्यक्षेत्रातील तालुक्यात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.
           मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुमारे १५०० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर मतदानाकरिता आज शनिवारी रमणमळा, कोल्हापूर येथून मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २१५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय १७३ मतदान केंद्रांसाठी १६ झोनल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडणूक प्रक्रियेसाठी २४ एसटी बस व इतर पन्नास हुन अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
             निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या १६ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदारांनी केंद्रावर दाखविणे अत्यावश्यक आहे. मतमोजणी मंगळवारी पाच रोजी सकाळी आठ वाजलेपासून सुवर्णभूमी हॉल मुस्कान लॉन कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. मतमोजणी १०० टेबलावर होणार असून त्याकरिता ५५० अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks