क!! तारळे येथे कोरोना लसीकरण शुभारंभ

कुडूत्री (प्रतिनिधी)
तालुक्यातील क॥ तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात covid-19 लसीचा शुभारंभ जि. प. सदस्य मा.पांडुरंग भांदिगरे यांच्या हस्ते करण्यात आला .
सध्या कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर संपूर्ण देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लस देण्याचं कार्य चालू करण्यात आले आहे आज प्रत्यक्ष लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी येथील आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य क्रमाने लसीकरण करण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी, आर,आर,शेट्टी. संजयसिंह पाटील, संदिप पाटील , सचिन पाटील, संजय भोपळे (सर), गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर कर्मचारी व लस घेणारे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.