ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची यशस्वी घोडदौड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात एनसीसी विभाग सुरू होऊन अवघी पाच वर्षे झाली आहेत. या पाच वर्षात चालू वर्षातील सहा कॅडेट्स सह एकूण नऊ कॅडेट्स भारतीय सेनेमध्ये दाखल झाले.
भारतीय सेनेमध्ये सेनेकडून अलीकडेच अग्नी वीर पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या.

या परीक्षेमध्ये मंडलिक महाविद्यालयाच्या पुढील सहा कॅडेट्सची यशस्वी निवड झाली: कॅडेट प्रथमेश आनंद मालवेकर, कॅडेट सौरभ रामचंद्र करडे, कॅडेट अभिजीत दिलीप खोत, कॅडेट संकेत बाजीराव मसवेकर , कॅडेट प्रथमेश जयवंत मगदूम आणि कॅडेट समर्थ रमेश वाईंगडे यासर्व कॅडेट्सचा महाविद्यालयाकडून, महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून आणि मुरगूड परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या कॅडेट्सना जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगुडचे सेक्रेटरी व कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार मा. संजयदादा मंडलिक आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक एडवोकेट मा. वीरेंद्रसिंह मंडलिक यांची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील आणि एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार अशोक प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks