एस. टी. कर्मचारी संपाला आजरा तालुक्यातील सर्व पुरोगामी संघटनाचा पाठींबा

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
या राज्यातील सर्व सामान्य गोरगरीब जनतेची असणारी लाल परी ही टिकली पाहीजे, यासाठी सुरू असलेल्या एस. टी. कर्मचारी संघटनाला पाठींबा दिला.
यावेळी बोलताना काॅ. संपत देसाई यांनी कर्मचारी यांची मागणी रास्त असून दिवस रात्र , सण-वार याचा विचार न करता कोणत्याही सेवा सुविधा नसता प्रामाणिकपणे कमी पगारात काम करणारे एस. टी. कर्मचारी याचा राज्यशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा आजरा तालुक्यातील संघर्ष करणाऱ्या संघटना रस्त्यावर उतरतील.
यावेळी जेष्ठ विचारवंत राजा शिरगुपे यानी आंदोलन हे कामगारानी लढले पाहीजे. विरोधी पक्षाचा पाठिंबा हे केवळ ढोंग आहे दिल्ली येथे दहा महिने शेतकरी आंदोलन करतात. त्यांचा विचार केला जात नाही. अशावेळी सर्व सामान्य जनतेची एस. टी. वाचवणे महत्वाचे आहे.
काॅ. संजय घाटगे यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थीचे शिक्षण , जेष्ट नागरिकांचा प्रवास, छोटे व्यापारी याचा विचार करून लाल परी टिकली पाहीजे. यावेळी शांताराम पाटील, काशिनाथ मोरे ,अजय देशमुख, शिवाजी गुरव, शिवाजी भगुत्रे ,बि के कांबळे दिनकर शिपुरकर , प्रतिभा कांबळे व एस टी कर्मचारी उपस्थित होते.