महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, साहित्यिक रमेश वारके यांचा आदर्शवत उपक्रम

बिद्री ( प्रतिनिधी ) :
सोशल मिडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला तर त्याचा प्रसार चांगला होतो.चांगल्या विचाराने व्हाॕटस्अॕपकडे पाहिल्यास आपले विचारही सकारात्मक बनतात.याच व्हाॕटस्अॕपवरील चांगल्या गोष्टींचे विचारधन साहित्यिक रमेश वारके यांचे व्हाॕटस्अॕपचा वाटाड्या या पुस्तकाची निर्मिती होय. हे पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन सरवडे येथील रुपाली विजय पाटील यांनी व्यक्त केले.
बोरवडे (ता.कागल ) येथे महिला दिनाचे औचित्य साधून साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या ‘ व्हॉटस्ॲपचा वाटाड्या ‘ या पुस्तकाचे प्रकाशन सामान्य गृहिणींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
यावेळी रुपाली पाटील, राजश्री पाटील, प्रज्ञा साठे, संपदा पाटील,आकनुरच्या उपसरपंच अनिता पाटील, शोभा वारके यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी संपदा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधत आकनुरच्या उपसरपंचपदी अनिता पाटील यांची निवड झालेबद्दल तसेच सामाजिक कार्याबद्दल सोळांकुर येथील संपदा निवास पाटील यांच्यासह सोनाळी नूतन ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे, मानवाधिकार संघटनेपदी निवडीबद्दल सुभाष पाटील, अंकुश पाटील यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गिता सरदेसाई, अरुणा डवरी, अनुराधा कुंभार, वैशाली वारके, प्राजक्ता सुर्यवंशी, सुमन पाटील,संगिता घोरपडे, सुप्रिया वारके, माधुरी माजगावकर, स्वराली वारके, यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
स्वागत व प्रास्ताविक लेखक रमेश वारके यांनी केले. सूत्रसंचालन सुनील माजगावकर यांनी केले तर आभार तुकाराम कुंभार यांनी मानले.