संगणक कौशल्य योजनेत कोल्हापूर राज्यात अव्वल, वर्षभरात तब्बल ७३५८ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुरगूड प्रतिनिधी – विजय मोरबाळे
मराठा, कुणबी मराठा, समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अर्थात सारथी व महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ एमके सीएल यांच्या वतीने सुरू असणाऱ्या संगणक कौशल्य योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.२०२४ सालात तब्बल ७३५८ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली असून जिल्ह्यातील शेकडो संस्थेतून याचे दर्जेदार प्रशिक्षण सुरू आहे.विद्यार्थी नोंदणी आणि प्रशिक्षण यामध्ये सलग दोन वर्षे कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे.
मराठा समाजातील युवक व युवतींना संगणक साक्षर करून विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास कार्यक्रम हा उपक्रम शासनाकडून सारथी व एमकेसीएल यांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत सुरू आहे.राज्यभरात सर्वत्र हा उपक्रम सुरू आहे.काही अटी नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी केली जाते.यानंतर स्थानिक एमकेसीएल च्या जिल्हा संस्थेकडून आणि सारथी कडून सदर कागतपत्रांची काटेकोर तपासणी होते.निकषांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिने चार टप्प्यावर विविध कोर्स द्वारे प्रशिक्षण दिले जाते.
या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक संस्थेतून विद्यार्थी सहभागी होण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.यामध्ये सर्वच ग्रामपंचतीच्या ग्रामसभेत सारथी च्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्या मार्फत पुरवली गेली.शिवाय शिवजयंती दिवशी जिल्ह्यातील सर्व किल्ल्यावर या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले गेले.शिकता शिकता कमवा ही योजना सुद्धा विद्यार्थ्यांना खुश करून गेली.याशिवाय विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबवले गेल्याने घराघरात सारथी च्या उपक्रमांची माहिती पोहचली.
साहजिकच या उपक्रमात विद्यार्थी प्रवेश राज्यात अव्वल झाले.या साठी सर्व संगणक प्रशिक्षण संस्थेची मोट बांधण्यासाठी जिल्हास्तरावर एमकेसील चे विभाग प्रमुख अनिल गावंडे,जिल्हा प्रमुख सचिन भोईटे,केंद्र समनव्यक सूरज पाटोळे,प्रवीण मुतालिक,स्वप्नील मुळीक यांनी बहुमोल योगदान दिले.या यशाबद्दल सारथीचे व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे, एमकेसील चे चीफ मेंटोर विवेक सावंत यांच्या हस्ते कोल्हापूर कार्यलयाचे अनिल गावंडे आणि सचिन भोईटे यांना गौरवण्यात आले आहे. फोटो ओळ :- सारथी आणि एमकेसील च्या संगणक कौशल्य उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आलेबद्दल कोल्हापूर कार्यालयीन प्रमुख सचिन भोईटे यांचा सारथीचे व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे, एमकेसील चेचीफ मेंटोर विवेक सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.