ताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगड : ढोलगरवाडी येथे हळदी- कुंकु समारंभ उत्साहात

नेसरी प्रतिनिधी पुंडलिक सुतार

चंदगड तालुक्यात ढोलगरवाडी येथे ग्रामपंचायत ढोलगरवाडी यांच्या वतीने हळदी- कुंकु कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

याप्रसंगी महिलांना मार्गर्दर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या म्हणुन हलकर्णी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.व्हटकर मॅडम यांनी महिलाना मागदर्शन करत महिलांना सक्षम बनने काळाची गरज आहे हे महत्व पटवून दिल.. प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समिति चंदगड उपसभापति मनिषा शिवनगेकर ,माजी उपसभापति वीठाताई मुरकुटे यांनी आपल मनोगत मांडल. दिपप्रज्वलन मुख्याधिपिका लिलाताइ पाटील यानी केल.या कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच सरिता तुपारे यानी महीलाना मार्गदर्शन करुन कोरोना सबंधित लस घेण्यास आवाहन केल.प्रमुख उपस्तिथी म्हणुन उपसरपंच बाबुराव तुपारे, अनिल शिवनगेकर, ग्रा.पं.सदस्य सुस्मिता संजय पाटील, शोभा विलास कांबळे, चन्द्रकांत सुतार,प्रा दीपक पाटील,तर ग्रामसेविका,आरोग्य सेविका,आशा,आंगनवाड़ी सेविका ,मदतनिस तसेच इतर ज्येष्ट मान्यवर उपस्तिथ होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दीपक पाटील यांनी करत गावच्या विकासात महिला पुढे येणे गरजेचे आहे असे त्यानी मत मांडल.तर सूत्र संचालन तंटामुक्त अध्यक्ष प्रा सदाशिव पाटील यानी केल.तर आभार विलास कांबळे यांनी मानले
यावेळी गावातील सर्व बचत गटाच्या महिला अध्यक्षा सदस्या ,ढोलगरवाडी गावचे आजी माजी पदाधिकारी व आदि महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks