कोल्हापूर : कागल तालुक्यात महिलेचा विनयभंग; मुरगुड पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

मुरगूड प्रतिनिधी :
हळदवडे (ता. कागल) येथे अडतीस वर्षाच्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच गावातील एकजणाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी रात्री सदर महिलेला ओढत नेऊन जनावरांच्या गोठ्यात या व्यक्तीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. शिवाय त्या महिलेला मारहाणही केल्याची तक्रार या महिलेने मुरगूड पोलिसांत तक्रार दिली आहे. यानुसार त्याच गावातील पांडुरंग भिवा भराडे (वय ५०) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
ही महिला रात्री आठच्या सुमारास गावातील एका दूध संस्थेतून दूध घालून घरी परतत असताना भराडे याने या महिलेच्या तोंडावर बॅटरी पाडली. तुमच्याकडे काम आहे असे सांगून शेजारील जनावरांच्या गोठ्यात बळजबरीने ओढत नेले.त्या ठिकाणी त्याने या महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी या महिलेने त्याला विरोध केला. त्यामुळे त्याने चक्क या महिलेला मारहाण केली. दरम्यान, आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक आल्याने त्याने तिथून पळ काढला.