ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड चे शिल्पकार एम.डी. रावण यांची उज्जैनकर फाउंडेशन च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड.

मुरगुड प्रतिनिधी :
मुरगूड चे हरहुन्नरी शिल्पकार एम .डी. रावण यांची उज्जैनकर संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.या संघटनेमार्फत शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळा येथे आयोजित करण्यात आले होते.त्याचे निमंत्रक म्हणून रावण यांना पाचारण करण्यात आले होते.
राज्यभरात विस्तारलेल्या या संघटनेने एम. डी.रावण यांची निवड करतांना त्यांच्या मधील विविध कलांचा ,नेपथ्य ,नेतृत्व व संघटन कौशल्याचा उपयोग राज्य स्तरावर व्हावा हा हेतू आहे.
सेनापती संताजी घोरपडे यांच्या इतिहासावर त्यांनी महानाट्य लिहिले आहे.१९४२चा स्वातंत्र्य लढा ,व लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या बलिदानावर त्यांनी नाट्य कलाकृती सादर केल्या आहेत.याशिवाय मंदिरातील प्रभावळ्यांची सजावट लघुपट, अशा विविध कलांचा उपयोग समाजास होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी सांगितली.