कोरोनाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेले कार्य गौरवास्पद. ! गोकूळचे जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांचे प्रतिपादन !

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेसाठी नेहमी कार्यरत राहून कोरोनाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेले कार्य हे गौरवास्पद आहे असे प्रतिपादन गोकूळ दुध संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांनी केले
शिरोली दुमाला ( ता . करवीर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना लसीचे वितरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच रेखा कांबळे होत्या .
यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्त नंदकुमार पाटील म्हणाले लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या आरोग्य सेवांबाबत चांगले कार्य केले . नामांकन प्राप्त आरोग्य केंद्रास सर्वतोपरी मदत करू
कार्यक्रमात ,बाजीराव पाटील , राहूल पाटील , मच्छिंद्र कांबळे ,तुळशी सहकार सुमूहाचे नेते सरदार पाटील , माधव पाटील ,मेहबूब शेख आदिनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ मधुरा मोरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायती तर्फ गौरव करण्यात आला .