शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदिप पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जीवबानाना जाधव पार्क येथील समाजसेवक आणि युवा नेते शिवसेना दक्षिण उपशहर प्रमुख प्रदिप पाटील यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
समाजसेवेची खरी ओळख म्हणजे गरजूंच्या पोटाची भूक भागवणे आणि त्यांना मदतीचा हात देणे. सामाजिक जाणीवेतून प्रेरित होत, प्रदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुकेलेल्यांसाठी मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले. नागरिकांसाठी भव्य अन्नछत्र ठेवण्यात आले होते.या उपक्रमात गरजू आणि गरीब नागरिकांना मोफत भोजन वाटप करण्यात आले.या उपक्रमामागील उद्देश समाजातील भुकेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे आणि समाजाला एकजूट करून मदतीसाठी पुढे आणणे हा होता. वाढदिवसाचा खर्च अनाठायी गोष्टींवर न करता, तो समाजहितासाठी वापरण्याचा संकल्प यानिमित्ताने घेतला गेला.
सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे प्रदिप पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “समाजाने मला खूप काही दिलं आहे. त्याचे ऋण फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. गरजूंसाठी अन्नदान करणे हाच खरा आनंद आहे.” या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांनी सहकार्य केले आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला. “भुकेल्यांना चार घास” या उपक्रमामुळे समाजसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे.
सायंकाळी महिलांसाठी स्पॉट गेम, एक मिनिट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रफुल्लीत केंद्राचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा आल्फिया बागवान, संचालिका रेशमा कातकर,शिवसेना महिला आघाडी उप शहरप्रमुख पूजा अरदंडे,राज्यस्तरीय आई पुरस्कार विजेत्या अनिता पाटील,मेन राजाराम हायस्कूलच्या व्यावसाईक शिक्षिका दिपाली पाटील, आखिल भारतीय हिंदू महासभा उप जिल्हा प्रमुख विकास जाधव, प्रकाश पाटील, शिवानी पाटील,पायल सनगर,प्रशांत पाटील,राजवर्धन आबदार,सिद्धेश चिले,श्री पाटील,प्रिन्स पाटील, बिस्मिल्ला नदाफ आदि नागरिक मोठ्या संखेने हजर होते.