ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सहकारमहर्षी व शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
बेनिक्रे येथील अंगणवाडी क्रमांक १३३ व १३४ या अंगणवाडी साठी लागणारे साहित्य (भेटवस्तू) व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी किरण हासबे, अमोल चौगले, गोपी मगदूम, पांडुरंग गुरव,तेजस पाटील, कृष्णात रामशे, हिंदुराव देसाई, सचिन मगदूम, नरेंद्र चौगले, बाळासो रामशे, गणेश देसाई, सुभाष रामशे, जयवंत पाटील,शामराव रामशे, विलास चौगले,सचिन पसारे, तसेच विद्यामंदिर बेनिक्रे शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस व विद्यार्थी उपस्थिती होते.
यावेळी अमोल चौगले व तेजस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .आभार गोपाळ मगदूम यांनी मानले.