कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल ; सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर प्रतिनिधी :
सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. येथे गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, सदावर्ते यांच्या जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आता पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापुरातील कोर्टात केले हजर, कडेकोट बंदोबस्त तैनात सदावर्ते यांना बुधवारी मुंबई येथील कारागृहातून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी त्यांना दि. २५ पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली होती.