राज्यात पुढील ३ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज ; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस पुढील 3 दिवस असणार आहे. आगामी तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर ओसरणार आहे. तर काही भागात मात्र मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सिक्कीमपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. तर विदर्भासह कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज विदर्भातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.