महागांव येथील सेवानिवृत्त कॅप्टन महादेव घुगरे यांचा सत्कार

महागाव : पुंडलिक सुतार
महागाव चे सुपुत्र व भारतीय सैन्य दलाचे जवान कॅप्टन महादेव रामचंद्र घुगरे हे सैन्य दलातून 32 वर्षांची उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेने त्यांचा सपत्नीक सत्कार झाला त्यांचा अल्प परिचय थोडक्यात जवान महादेव घुगरे हे सैन्यात 1989 ला मराठा रेजिमेंट बेळगाव ला भरती झाले. तिथेच त्यांचे प्रशिक्षण झाले. या नंतर त्यांनी चेन्नई,नागालँड,जम्मू काश्मीर,उरी सेक्टर,पुणे,पुंच्छ राजस्थान,मणिपूर,महू येथे इनफंट्री स्कुल टिचर,ग्वाल्हेर,कारगिल,बंदीपुरा,सन 2018 ला राष्ट्रीय रक्षा अकादमी पुणे येथे ट्रेनिंग सुभेदार मेजर म्हणून त्यांची निवड झाली. वरील ठिकाणी त्यांनी सेवा बजावली असून 15 ऑगस्ट 2022 ला ते लेफ्टनंट झाले व 26 जानेवारी ला त्यांची कॅप्टन पदावर निवड होऊन 31 जानेवारी 2022 ला ते पुणे ईथुन सेवानिवृत्त झाले एन डी ए ला उत्कृष्ट ट्रेनिंग कामगिरीसाठी कामांडेशन चे त्याना सन्मान पत्र मिळाले आहे.
सेवानिवृत्ती निमित्त त्यांची सपत्नीक सजविलेल्या वाहनातून शिवाजी चौक ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली दारातून महिलांनी व मुलींनी रांगोळी टाकली होती. घुगरे परिवाराच्या वतीने लहान भाऊ आनंदा घुगरे ,तर सूर्योदय कला व क्रीडा मंडळाच्या वतीने संतोष अजगेकर,केसरकर सर व कार्यकर्ते,तसेच आजी माजी सैनिक संघटना वतीने सत्कार झाला.
प्रास्ताविक केसरकर सर तर सूत्रसंचालन एम बी पाटील सर यांनी केले आभार विठल घुगरे यांनी मानले यावेळी सतीश पाटील जी प सदस्य,आजरा कारखाना चेअरमन प्रा सुनील शिंत्रे,अप्पी पाटील माजी सभापती ,युवानेते व संचालक प्रकाश पताडे,विष्णुपंत केसरकर माजी सभापती,माजी सरपंच विठल कांबळे,व ग्रामस्थ ,मान्यवर हजर होते त्यांच्या जीवन प्रवासात पत्नी सौ सुनीता,मुलगा सुशांत,मुलगी शुभांगी ,यांचे योगदान लाभले आहे.