ताज्या बातम्या
स्मिता फाउंडेशन :एक सहकार्य कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या बांधवांसाठी.

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
आज सकाळी स्मिता फाउंडेशन यांच्या वतीने या कोवीड महामारी मध्ये लोकांची सेवा करण्यासाठी जे सकाळपासून अहोरात्र झटून आपले कार्य चोख बजावत असतात. अश्या प्रतिभानगर येथील, वि स खांडेकर शाळा (रेड्याची टक्कर ) येथील सफाई कामगार,आरोग्य कर्मचारी,या सर्व 130 लोकांच्या टीमला चहा, नाश्ता, पाणी बॉटल, स्मिता फाउंडेशन तर्फे वाटप करण्यात आले.
यावेळी स्मिता फाउंडेशन च्या वतीने अजुन ही अश्या मदत होत राहतील असे सांगितले.
यावेळी,स्मिता सावंत मांडरे,पुज्या शिंदे,जयेश भाई ओसवाल,राजतकुमार ओसवाल,भानुदास सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.