ताज्या बातम्यामहाराष्ट्र
गडहिंग्लज येथे आगामी गणेशोत्सव संदर्भात बैठक संपन्न

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आगामी गणेशोत्सव निमित्त छ.शाहू हॉल ,नगर परिषद गडहिंग्लज येथे पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित पोलीस पाटील व पोलिसांना शासकीय नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकित अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , आजरा पोलीस ठाणे स.पो.नि. बालाजी भांगे , गडहिंग्लज पोलीस ठाणे चे प्रभारी सुनिल हारूगडे , नेसरी पोलिस ठाणे चे अविनाश माने , तसेच नगराध्यक्षा सौ . स्वाती कोरी , मुख्याधिकारी (गड . नगर परिषद) तसेच गटविकास अधिकारी, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील पोलीस पाटील , व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.