साळगाव येथे श्री. केदारलिंग मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात संपन्न.
शनिवार व रविवार या दोन दिवसाच्या या उत्सवकाळात सर्वजण न्हाऊन निघाले होते. उत्सवकाळात ब्राम्हणांच्या वेदमंत्राच्या उदघोशात होमहवन, मूर्ती शुद्धीकरण,व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
साळगाव तालुका आजरा येथील श्री केदारलिंग मंदिराचा वास्तुशांती व कळसारोहन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कळस व मूर्ती मिरवणूक शनिवारी सकाळी आठ वाजलेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत गुलालाच्या उधळणीत व जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात काढण्यात आली. महिलांनी आपल्या घरासमोर उत्कृष्ठ अशा रांगोळ्या काढल्या होत्या.
शनिवार व रविवार या दोन दिवसाच्या या उत्सवकाळात सर्वजण न्हाऊन निघाले होते. उत्सवकाळात ब्राम्हणांच्या वेदमंत्राच्या उदघोशात होमहवन, मूर्ती शुद्धीकरण,व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गगनगिरी महाराज कसबा नूल यांचे शुभ हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीसमोर किणी वाठार येथील चेतक अश्व समोर वाद्य देवाची पालखी सोबत पुजारी ,मानकरी, भाविक ,ग्रामस्थ अशी लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. पै पाहुणे, माहेरवाशिणी यांनी आणलेला गारवा विठ्ठल रुक्मिणी संप्रदाय भजनी मंडळाने दिंडीने आणला. हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन, दोन दिवस हरिजागर व तुंग जिल्हा सातारा येथील भूपाळी ते भैरवी आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते उत्सव पार पाडण्यासाठी सर्व कमिटी पदाधिकारी,सदस्य,मंडळे,ग्रामस्थ,साळगाव ग्रामविकास मंडळ मुंबई ,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,सेवा संस्था,भाविक भक्त यांनी परिश्रम घेतल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.