‘कजाप बोगसगिरी’च्या तपासात टाळाटाळ शिवसेनेची तक्रार

गडहिंग्लज प्रतिनिधी :
गडहिंग्लज येतील भूमीअभिलेमधील ‘कजाप’मध्ये झालेल्या बोगसगिरीबाबत पोलिसात तक्रार होऊनही तपास रखडला असून यामुळे फौजदारी गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ होता आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशाप्रकारे शहर शिवसेनाच्या वतीने तहसीलदारांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की गडहिंग्लज शहर व नेसरी , तारेवाडी येथे कोठयावधी रुपयांच्या असणाऱ्या जागेत दि . २४ नोव्हेंबर २०२० रोजी गडहिंग्लज भूमि अभिलेख कार्यालयाच्या नावाने कजाप मध्ये बोगसगिरी झालेचे उघडकीस आल होते . त्यामुळे गडहिंग्लज शहर शिवसेनेकडून भूमिअभिलेख कार्यालयास निवेदन देवून बोगसगिरी करणेचा शोध घेवून पोलिस कारवाई करणेची मागणी केली तर त्याची दखल घेवून व गडहिंग्लज तहसिलदार यांचे आदेशानुसार भूमिअभिलेख कार्यालयाने तत्या आरोपींचा शोध घेवून कजाप मध्ये बोगसगिरी झाल्याचे सिध्द झाले . दि . २१/०१/२०२१ रोजी त्या आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र भूमि अभिलेखचे मुख्य सहाय्यक यांनी पोलिस स्टेशनकडे सादर केलेले आहे . परंतू पत्र देवून सहा महिने होत आले तरी अद्याप गुन्हा नोंद केलेला नाही . त्याबाबत पोलिसांना विचारणा केल्यास माझ्याकडे तपास नाही म्हणून दुसऱ्याकडे तपास चालू आहे त्यांना विचारलेस आजून तपास सुरू आहे असे एक ना अनेक उत्तरे पोलिसांकडून मिळत आहेत त्यामुळे आपणाकडे मागणी करीत आहे की , कजाप मध्ये बोगसगिरी करणान्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत अन्यथा त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागण्यात आहोत निवेदनावर उपशिवसेना शहर प्रमुख काशिनाथ गडकरी व अनिल खवरे यांचे सह्या आहेत