शिरोली दुमाला येथे होळी लहान शेणी दान उपक्रम राबविला

सावरवाडी प्रतिनिधी :
पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता इंधन बचत करून पारंपारिक रूढीना फाटा देत शिरोली दुमाला ( ता . करवीर ) येथील होळी सणाचे औचित्य साधून जय हिंद तरूण मंडळ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार शेणी स्मशानभुमीसाठी दान देण्याचा उपक्रम रविवारी राबविण्यात आला
गावातील मुख्य चौकात शेणी दान चा कार्यक्रम राबविण्यात आला . शेणी दान उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्यात आला होता . जमा झालेल्या दोन हजार शेणी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कौलवे यांच्या हस्ते स्मशानभुमीकडे देण्यात आल्या
यावेळी उपसरपंच सचीन पाटील, वैभव कौलवे, अविनाश जाधव, विशाल कौलवे , सचीन चोपडे, विक्रम कौलवे, ऋषीकेश कौलवे, जयदीप परिट, लखन कांबळे, नागेश कौलवे, कुणाल चावरे, ओंकार कळंत्रे, प्रसाद कळंत्रे, यश पाटील , सिध्दार्थ जाधव, काशिनाथ सरूडकर, आदिनी परिश्रम घेतले