भविष्यात शाहूचे १५ लाख मे.टन ऊस गाळपाचे नियोजन ; गळीत हंगाम 2020-21 ची यशस्वी समाप्ती : चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे

कागल,प्रतिनिधी .
शाहू साखर कारखान्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासात्मक वाटचालीचे नियोजन तयार आहे. आता यापुढे शाहू साखर कारखान्याचे 15 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट राहील, त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
शाहू साखर कारखान्याच्या 41 व्या गळीत हंगाम समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभ वेळी ते बोलत होते.
या ऐतिहासिक कामगिरी बद्दल श्री.घाटगे यांचा शाहू साखर कारखाना कर्मचारी संघटना,तोडणी -वाहतूक संस्था,कर्मचारी पतसंस्थेसह शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.
व्यासपीठावर शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,श्रीमंत प्रविणसिंहराजे घाटगे, सौ.नंदितादेवी घाटगे,सौ.नवोदिता घाटगे,विरेंद्रसिंहराजे घाटगे , हिंदकेसरी दिनानाथसिंह ,उदयबाबा घोरपडे,कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील,विठ्ठल पाटील यांच्यासह सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती .
ते पुढे म्हणाले ,शाहू कारखान्यांने या हंगामात १० लाख मे.टन ऊस गाळपाचा पार केलेला टप्पा हा कारखान्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. हा क्षण पाहण्यासाठी कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे असायला हवे होते. त्यांनाही निश्चितच आनंद झाला असता. त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आमची वाटचाल सुरू आहे .भविष्यातील पाच वर्षाच्या विकासाकात्मक नियोजनाचा आराखडा तयार असून आता १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट राहील. त्याप्रमाणे नियोजन सुरू आहे.असे सांगताना ते म्हणाले,या यशाचे मानकरी शाहू कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी कर्मचारी अधिकारी व पुरवठादार हेच आहेत .
यावेळी प्रकाश कदम( कोगनोळी), संजय बरकाळे (जैन्याळ) व्ही.डी. कुलकर्णी (दिंडनेर्ली) उत्तम पाटील( बाचणी) यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी लहू शिंदे, सुनील निकम, ज्ञानदेव पाटील,रंगराव पोवार, विपुल कोळाज, ऋषिकेश लोकरे, शंकर पाटील या तोडणी /वाहतूक कंत्राटदारांचा जास्तीत जास्त ऊस पुरवठा केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
तसेच नागपूर येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत पै.दिनानाथसिंह यांनी हिंदकेसरी ‘किताब मिळविला त्याला 27 मार्च 2021 रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आज शाहू ग्रुप च्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला.
याच बरोबर महिला कुस्तीगिर सृष्टी भोसले,सोनल सावंत,कराटेपटू संस्कार पाटील,ओम दावणे या खेळाडूंचाही सत्कार केला.
स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले .प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.
छायाचित्र -कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 41 व्या गळीत हंगाम समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभ प्रसंगी बोलताना चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे
**दृष्टीक्षेपात गळीत हंगाम २०२०-२१*
एकुण ऊस गाळप-१० लाख १७ हजार मे.टन
एकुण साखरउत्पादन १२लाख क्विंटल.
थेट ऊसाच्या रसाच्या सिरपपासून इथेनाल निर्मिती -६५ लाख लिटर्स अधिक
सी, हेवी मोलसीस पासून इथेनाल निर्मिती २० लाख लिटर्स.
डिस्टीलरी उत्पादन- ८४ लाख लिटर्स
आजपर्यंतची वीज निर्मिती -६.५० कोटी युनिट
एकुण साखर निर्यात कोटा-३लाख २५हजार क्विंटल पैकी शाहू कारखान्याचा साखर निर्यात कोटा-१ लाख ८५ हजार क्विंटल ,इतर कारखान्यांकडील घेतलेला साखर निर्यात कोटा -१लाख ४० हजार क्विंटल .