छत्रपती शिवाजी महाराजाची विटंबना करणाऱ्याचा चौरंग्या करा : हिंदुत्ववादी संघटना

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
सदाशिव नगर, बेंगळूरू येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून विटंबना करण्याची निंदनीय घटना हेतुपुरस्सर घडवून आणली. त्यामुळे महाराष्ट्रात समस्त शिवप्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमान करण्याचाही प्रयत्न कर्नाटकातील काही संघटना आणि समाजकंटकांकडून होत आहे.
भारत देश टिकवून ठेवण्यासाठी समता व बंधुता राखण्यासाठी अनेक थोर व्यक्तीने राजे-रजवाडे यांनी या मातीसाठी आपल्या जीवनाचे योगदान आणि बलिदान दिले आहे. त्यांच्या अनमोल कार्याचा आदर-सन्मान करण्यासाठी आपण आपल्या देशात थोर व्यक्तींचे पुतळे प्रतिष्ठापीत करतो. त्या पुतळ्यांचा योग्य तो आदर-सन्मान या जनतेला किंवा प्रशासनाला करता येत नसेल तर या थोर व्यक्तींचे पुतळे प्रतिष्ठापीत करू नयेत.
आजच्या या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची विचारशैली आणि त्यांनी केलेले संस्कार अंगीकारले पाहिजेत. याची आज खूप गरज आहे. या समाजकंटकांनी हे भ्याड कृत्य करण्यापेक्षा समोरासमोर येऊन आपले प्रश्न निवारण करून घ्यावेत. अन्यथा या भ्याड कृत्य करणाऱ्या समाजकंटकांशी आमची दोन हात करण्याचीही तयारी आहे.
आपल्या समस्त हिंदू समाजाला एकत्र जोडणारा एकच दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोल्हापुरातील मर्दानी आखाडे, हिंदुत्ववादी संघटना आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवाजी चौकात आज जाहीर निषेध करण्यात आला. शिवप्रेमी, हिंदूप्रेमी,सर्व आखाडे यांच्या माध्यमातून जसे छत्रपती शिवाजी महाराजांना देव समजून पूजले जाते, त्याच पद्धतीने कर्नाटकात श्री बसवेश्वर महाराजांना पूजले जाते, सन्मानित केले जाते. म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे की, जो माणूस देशासाठी, धर्मासाठी जगतो त्याचा सन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळे आम्ही आज श्री बसवेश्वर महाराज यांना शिवाजी चौकात दुग्धाभिषेक घातला.
आज हे समाजकंटक समाजाला आणि भारत देशाला राजकारण करून तोडू पाहत आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करून राजकारण करण्याची विकृती ज्यांच्यामध्ये आहे ती त्यांनी त्वरित सोडून दिली पाहिजे. सर्व हिंदू बांधवांना आणि सर्व भारतीयांना विनंती आहे की, अशा समाजकंटकांना शोधून जसे महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचे पाय तोडून त्याचा चौरंगा केला होता, तसाच चौरंगा या समाजकंटकांचा ही करा हे जर तुम्हाला जमत नसेल तर या समाजकंटकांना हिंदुत्ववादी संघटनांच्या ताब्यात सोपवा. “धर्मासाठी जगावे झुंझुनी अवघेची मरावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालवावे परिते ||” असा उल्लेख शिवरायांच्या प्रार्थनेत केला आहे. आपण या समाजकंटकांना तेथेच तोडून टाकायला हवे होते. पण समाजकंटकांचा देशद्रोही कावा कळण्यास आपल्याला वेळ झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हा शिवप्रेमी व हिंदूप्रेमींवर त्यांच्या विचारशैलीचे संस्कार आहेत, आम्ही श्री बसवेश्वर महाराजांची दुग्धाभिषेक केला केला म्हणून असे समजू नये नये की आम्ही षंढ आहोत. वेळ प्रसंगी आम्ही तुमची सुद्धा गय करणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने आणि जनतेने देशातील राजे-रजवाडे आणि थोर व्यक्तींचा आदर सन्मान राखावा. याच भारत देशात राहून देशाला योगदान दिलेल्या थोर व्यक्तींच्या पुतळ्याला काळे फासून जे समाजकंटक विटंबना, अनादर करत असतील तर, त्यांना या देशात राहण्याचा काही हक्क नाही. या समाजकंटकांनी ताबडतोब देश सोडून जावे. अन्यथा आम्ही त्यांना जग सोडून सोडण्यास भाग पाडू हा हिंदुत्ववाद्यांचा रोख इशारा आहे.समस्त *हिंदुत्ववादी संघटनांचे अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे. सेवाव्रत प्रतिष्ठान, बजरंग दल, समस्त हिंदुत्ववादी संघटना, पतीत पावन संघटना, वंदे मातरम संघटना, क्षत्रिय मराठा संघटना, हिंदुमहासभा, शांतिदूत आखाडा, उत्तरेश्वर आखाडा, मर्दानी खेळ आखाडा, घाडगे हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, शिवप्रतिष्ठान, युवा हिंदुस्तान, सनी पेणकर, प्रशांत कागले, अवधूत भाटे, संजीव सलगर, प्रसाद मोहिते, विश्वकर्मा व्हटकर, विकास भोसले, शुभम जाधव, रमेश लव्हटे,अनिल चोरगे, अतुल शिंदे,अवधूत घाटगे, शामराव केसरकर, दत्ता जाधव, राजकुंवर घाडगे, जान्हवी पाटील, स्वाती पाटील.