प्रशासनाने सफाई कामगारांची स्वतंत्र जेष्ठता यादी बनवा.- समाजरत्न मा.सुरेश तामोत

प्रतिनिधि
दि.१२/०४/२०२१ रोजी
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर
[सी.पी.आर.] – कोल्हापूर येथे मा. अधिष्ठाता – डॉ.मोरे सोयांचे दालनात वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अनुषंगाने बैठक आयोजित केली होती.
समाजरत्न मा.सुरेश तामोत
मुख्य सचिव, महाराष्ट्र प्रदेश
शिवराज्य सफाई कर्मचारी सेना यांनी
१) महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचना दिनांक ६ जून २०१७ अनुसार स्वच्छक / सफाईगार यांचे मधून शैक्षणिक पात्रता निकष धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मुकादम पदावर नियुक्ती देण्यात याव्यात जेणेकरून सफाई कर्मचारी यांचेवर अन्याय होणार नाही यासंदर्भात प्रभावी भूमिका मांडली.
२)१] मा.मुकेश सारवान
मा.अध्यक्ष (प्र)
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग
यांनी दिलेले निर्देश
२ ] मा.सह संचालक(दंत)सो,
वैद्यकीय शिक्षण व संशोधन,मुंबई यांचे आदेश नुसार सफाई कर्मचारी यांना मालकी हक्काने सेवा-निवासस्थान (घर) देणेची अंमलबजावणी करण्यात यावी.
३) सर्व सफाई कर्मचारी यांना त्यांचे मासिक वेतन व भत्ते या व्यतिरिक्त दरमहा रुपये 1 हजार कोविड भत्ता
[ माहे मार्च ते सप्टेंबर ] देण्यात यावा.
४) कोरोना ने मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांचे कुटुंबीयांना रु.५० लाख इतकी विमा संरक्षण रक्कम आदा करण्यात यावी.
५) सफाई कर्मचारी यांना कोरोना – योद्धा प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात यावे.
६) सर्व सफाई कर्मचारी सेवा पुस्तके भरण्यात यावीत.
या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
सदर बैठकीस –
मा.काटकर सो,
प्रशासकीय अधिकारी,
मा.अनिल लाड
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
शिवराज्य सफाई कर्मचारी सेना
मा.राजेश वालेकर
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
शिवराज्य सफाई कर्मचारी सेना
मा. प्रभाकर लाड
सचिव पश्चिम महाराष्ट्र
शिवराज्य सफाई कर्मचारी सेना
मा. गौरव वालेकर
सचिव महाराष्ट्र प्रदेश
उपेक्षित दलित सामाजिक परिषद यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
