शिरोली दुमाला गावच्या उपसरपंचपदी सचिन पाटील यांची निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालूक्यातील शिरोली दुमाला गावच्या उपसरपंचपदी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री विश्वासराव नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन विश्वास राव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली..
मावळते उपसरपंच सरदार पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.यावेळी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील बोलतांना म्हणाले पाच दशकापूर्वी मीही या गावचा उपसरपंच झालो होतो . योगायोगाने आज आमचे चिरंजीव सचिनर पाटील यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ पडली या पदाचा वापर त्यांनी गावाच्या विकासासाठी करावा .
यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य, जिल्हा परिषेदेचे सदस्य सूभाष सातपूते, करवीर पंचायत समिती माजी सदस्य सूनिल पाटील.सरपंच रेखा कांबळे, विरशैव बॅंकेचे चेअरमन अनिल सोलापूरे.,माजी सरपंच नंदकुमार पाटील , माधव पाटील , माजी सरपंच एस के पाटील,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.