यमगे येथील जुळ्या बहिणी आर्या आणि आदीतीचे दहावीच्या परीक्षेत लख्ख यश

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड (मूळगाव यमगे ता. कागल) येथील आर्या अनिल पाटील आणि आदिती अनिल पाटील या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत लख्ख यश मिळवले आहे.आर्या ने ९६ तर आदिती ने ९५.२० टक्के गुण मिळवले आहेत.आर्या ने इंग्रजी ला ९६ गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे तर आदिती ने टेक्निकल या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.या दोघी लोकमत चे मुरगूड वार्ताहर अनिल पाटील याच्या कन्या आहेत.
येथील मुरगूड विद्यालय मध्ये त्यांनी इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला होता.जुळ्या असल्याने अगदी लहानपणापासून त्या औत्सुक्याचा विषय बनल्या होत्या.दोघी ही लहानपणापासून हुशार होत्या.आतापर्यंत सर्वच इयत्ते मध्ये त्या पहिल्या तीन क्रमांकात नेहमी यशस्वी होत होत्या.पहिली ते चौथी पर्यंत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन पाचवी ला मुरगूड विद्यालयात सेमी माध्यमामध्ये त्या प्रविष्ठ झाल्या होत्या.अभ्यासामध्ये सातत्य,शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन,आई वडिलांचे मौलिक मार्गदर्शन या जोरावर हे यश मिळवल्याचे दोघीनी ही सांगितले.आर्या ने आय आय टी मध्ये तर आदिती ने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा मनोदय बोलून दाखवला.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ मंजिरी मोरे देसाई, कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपप्राचार्य एम.डी खटांगळे, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी,पर्यवेक्षक एस.डी.साठे,पी.बी.लोकरे,वडील अनिल पाटील,आई जया पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतरांचे मार्गदर्शन लाभले.