प्रेरणादायी आणि उपक्रमशील कौलवचे सुपुत्र प्रा शिवकुमार प सोनाळकर

कौलव प्रतिनिधी :
कौलव गावचे सुपुत्र प्रा शिवकुमार प सोनाळकर राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत आणि डाव्या ,पुरोगामी विचारसरणीच्या मोठे बंधु कोल्हापूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष ॲड अरुण प सोनाळकर यांच्या छत्र छायेखाली मोठे झाले. शिक्षण पूर्ण केलेनंतर शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथे श्री शिव शाहू महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजु झाले. तेथे ३४ वर्षाच्या शैक्षणिक कार्यात सुरुवातीला प्राध्यापक म्हणून नंतर विभाग प्रमुख ,एम फील,पी एच डीचे मार्गदर्शक म्हणून काम करु लागले. त्यांनी’ दर्पन ‘मधील सामाजिक अभ्यास या विषयावर एम फिल आणि ‘१९६० नंतरच्या स्त्रीयांच्या कथांचा सामाजिक अभ्यास ‘या विषयावर पी. एच. डी. करुन संशोधन क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करुन स्वतःची ओळख निर्माण केली. सामाजिकता,भाविकता ,दर्पण दर्शन या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे आणि विज्ञानावरील कथासंग्रह आणि द्विखंडात्मक संदर्भ ग्रंथ हे ग्रंथ प्रकाशनच्या मार्गावर आहेत.
२५ वर्षे महाविद्यालयात ‘प्रज्ञांजली’या नियत कालीकेची धुरा संभाळली असुन त्यांना विद्यापीठाची १०५ पारितोषिक प्राप्त केली आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या स्थापनेत आणि जडणघडणीत सचिव,खजिनदार आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आपल्या विभागाचे आणि महाविद्यालयाचे नाव शिवाजी विद्यापीठात अभिमानाने झळकवले म्हणून ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. आज ते ३१मे ला शैक्षणिक क्षेत्रातील सहप्रवासी ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत, तसेच आज त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.