जमिनीवर राहणार यांवर प्रेम करा तरच वरती राहणारा तुमच्यावर प्रेम करेल: जाफर ( बाबा) सय्यद

कोल्हापूर प्रतिनिधी:
कोरोना व लॉक डाऊन च्या काळात जात- पात ,धर्म न मानता ज्याच्या – त्याच्या धर्मानुसार कित्येक जणांचा अंत्यविधी केल्याबद्दल तसेच गरीब व गरजू लोकांना औषधे , महिनाभर पुरेल एवढे राशन स्वखर्चाने दिल्याबद्दल मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट नवी दिल्ली यांच्यामार्फत जाफर ( बाबा) सय्यद यांना जोथपूर रत्न या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या वर प्रेम करा म्हणजे वरती राहणारा तुमच्यावर प्रेम करेल. तसेच आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम तसेच इथे जातीच्या ही लोकांनी एकजुटीने एकत्र राहिल्याने संपूर्ण जगाला एकजुटीचा संदेश जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व मानव अधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे जोधपूर रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आभारही मानले . स्वागत व आभार मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष महमदयासिन शेख कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश नंदे, मंत्री योगेश पोवार ,करवीर मीडिया अध्यक्ष सचिन चौगले, उमर सय्यद, कादर मलबारी ,तौफिक मुल्लानी, रियाझ सुभेदार ,अब्दुल हमीद मिरशिकारी उपस्थित होते.