दहशतवाद्यांना फाशी द्या, पहलगामा मधील हल्ल्याचा निषेधार्थ समस्त गडहिंग्लज करांकडून निषेध

गडहिंग्लज प्रतिनिधी: राजेंद्र यादव
जम्मू काश्मीर मधील पहलगामा येथे दहशतवाद्यांनी २७पर्यटकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत.पहलगाम येथील अतेरिक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज समस्त गडहिंग्लज कर यांनी गडहिंग्लज शहरातून निषेध फेरी काढून आपल्या भावना व्यक्त केल्या .यावेळी निषेध फेरीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आप आपली मनोगते मांडली.
यावेळी भारत माता की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय, दहशतवाद्यांना फाशी द्या, मुर्दाबाद मुर्दा बाद पाकिस्तान मुर्दाबाद,आदी घोषणा या निषेध फेरी मध्ये देण्यात आल्या.निषेध फेरी काढण्यापूर्वी भ्याड हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर मोर्चा मुख्य मार्गावरून फिरून दसरा चौक येथे पोहचला. या निषेध मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी गडहिंग्लज शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता .नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे गडहिंग्लज ने एकजुट कायम असल्याचा व आपल्या राष्ट्र भक्ती बद्दलचा सशक्त संदेश या मोर्चा मध्ये दिसून आला. विशेष म्हणजे या मोर्चा मध्ये मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी आपला सहभाग या मध्ये नोंदविला होता.