ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : रंकाळा विकासासाठी दरवर्षी एक कोटी रुपये ; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा : रंकाळ्यावर विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे

ऐतिहासिक रंकाळ्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटी रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा परिसरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रंकाळा पदपथ उद्यानात हा कार्यक्रम झाला.पालकमंत्री पाटील म्हणाले,रंकाळा हे कोल्हापूरचे वैभव आहे.येणाऱ्या पर्यटकांची अंबाबाई व रंकाळा ही दोन्ही जिव्हाळ्याची भेट देणारी ठिकाणे आहेत.त्यामुळे रंकाळा विकासासाठी निश्चितच योगदान दिले जाईल.पाटबंधारे विभागाकडे असलेली रंकाळा परिसरातील जागा हस्तांतरित करू.तातडीने 50 लाख रुपये निधी मंजूर करून रंकाळ्यावर विद्युतीकरणाचे काम करून रंकाळा प्रकाशमय केला जाईल. रंकाळा व कळंबा ही शहरातील दोन्ही ठिकाणे राज्यात आदर्शवत करण्यासाठी काम करु.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत रंकाळा विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे. रंकाळ्यावर नगरसेवक देशमुख यांनी नाविन्यपूर्ण काम केले. रंकाळा संवर्धनात लोकांचा असलेला सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे.
शारंगधर देशमुख म्हणाले, पालकमंत्री पाटील व महापालिका फंडातून रंकाळा परिसराचा विकास केला आहे.या पुढील काळातही रंकाळ्याचा सर्वांगीण विकास करू.
रंकाळा संवर्धनासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल शाहीर राजू राऊत,श्रीकांत कदम,सुधीर गांधी, अजित मोरे,गुंडोपंत जितकर, राजेंद्र पाटील,विकास जाधव, धोंडीराम चोपडे,प्रा.एस.पी. चौगुले,सुभाष हराळे,आनंदराव चिखलीकर,संभाजी पोवार,कृष्णा सुतार,पांडुरंग इंगवले,ऋषीराज जाधव,अमित बुट्टे यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर,माजी उपमहापौर संजय मोहिते,माजी नगरसेवक सचिन पाटील, दीपा मगदूम,रीना कांबळे,माधुरी लाड,अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, वसंतराव देशमुख,शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अनुराधा वांढरे,विजय सावंत आदी उपस्थित होते.राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.संदीप मगदूम यांनी सूत्रसंचलन केले. किरण पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापूर :रंकाळा पदपथ उद्यानात स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, शारंगधर देशमुख,निलोफर आजरेकर,संजय मोहिते,नितीन देसाई आदी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks