ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कु. बिरदेव डोने यांचे फोनवरून अभिनंदन ; बिरदेव डोणेंच्या यु. पी. एस. सी. परीक्षेतील लखलखीत यशाचा सार्थ अभिमान

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

यमगे ता. कागल गावचे सुपुत्र कु. बिरदेव सिध्दाप्पा डोने यांनी यूपीएससी परीक्षेत लखलखीत यश मिळविले. सबंध भारत देशात ते 551 व्या रँकवर आले. त्यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन केले. त्यांच्या या यशाचा कागल तालुक्यासह सबंध कोल्हापूर जिल्ह्याला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

कु. बिरदेव डोने हे कागल तालुक्याचे सुपुत्र आहेत. मेंढपाळ आई-वडिलांपोटी जन्मलेल्या या सुपुत्राने अत्यंत खडतर परिस्थितीतून मिळवलेले हे यश घवघवीत आहे. त्यांनी कागल तालुक्याची आणि कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. यमगेसारख्या छोट्याशा खेड्यात वाढूनही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाचा आम्हा सर्वांना अभिमान आणि गौरव वाटतो.

कु. बिरदेव डोणे यांच्या ह्या यशानिमित्त ग्रामस्थ रविवारी दि. २७ त्यांची गावातून जल्लोषी मिरवणूक काढणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks