ग्रामीण भागातील पुरग्रस्तांसाठी तळमळीने काम करणार : युवा नेते निलेश वरुटे यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
महापूरामुळे ग्रामीण पुरग्रस्तांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . शासनाच्या विविध योजनांचा पुरग्रस्तांच्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे . सेवाभावी वृत्तीने ग्रामीण भागातील पुरग्रस्तांच्यासाठी तळमळीने काम करणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते निलेश वरुटे यांनी केले.
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे विश्व वारकरी चिंतन सांप्रदाय यांच्या माध्यमातून पूरग्रस्त 81 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप कार्यक्रमात वरूटे, बोलत होते.
अध्यक्षस्थानी सावरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय खाडे होते.
वरुटे म्हणाले . या वर्षी कोरोना आणि महापूर या संकटामुळे सामान्य जनता हैराण झाली . शासनाने पुरग्रस्तांना विविध योजना जाहिर करून शासकिय मदत मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना धनंजय खाडे म्हणाले पुरग्रस्तांना विविध भेटवस्तु देण्यासाठी युवाशक्तीने एकत्र येऊन देशसेवेचे व्रत जपले पाहिजे.
यावेळी विविध मान्यवरांच्या य हस्ते पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले . यावेळी राज वरूटे , पंडीत काटकर,विश्वजीत तिबीले,सतीश सातपुते,संदिप मगदूम, गोरख कुंभार . भिकाजी सातपुते,विजय तिबीले,सनराज आंबी,केरबा गुरव , आदिनी मनोगत व्यक्त केले.