ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भारताने 4 वर्षाखालील मुलांसाठीच्या अँटी-कोल्ड ड्रगवर घातली बंदी

भारताच्या ड्रग्ज रेग्युलेटरने 4 वर्षांखालील मुलांसाठी अँटी-कोल्ड ड्रग कॉम्बिनेशनच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यासोबतच औषधांचे लेबलिंग त्यानुसार करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. विहित औषधांच्या संयोजनात क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन यांचा समावेश आहे. सर्दीच्या सामान्य लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे सहसा सिरप किंवा गोळ्यामध्ये वापरले जाते. जगभरात 141 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे या बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.