रमाई आवास योजनेच्या ४७ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप ; बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या घरकुलधारकांना दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या धनादेशांचे वितरण

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील रमाई आवास योजनेच्या ४७ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल आमदार श्री. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले वसाहत, दावने वसाहत, संत रोहिदास चौक, माळभाग वड्डवाडी, श्री. शाहूनगर बेघर वसाहत, मातंग वसाहत येथील रहिवाशांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जातीचा बहुजन समाज माझे कुटुंब बनला आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठीच संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार आहे.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गेली २० वर्षे रमाई आवास योजना शहरात राबविली आहे. त्यामुळेच झोपडपट्ट्या, पडकी, कौलारू जीर्ण झालेली घरे जाऊन एक हजाराहून अधिक कुटुंबे आरसीसी घरात राहत आहेत. एखाद्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीला लाजवेल, असे त्यांचे राहणीमान झाले आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक विवेक लोटे, भगवान कांबळे, गणेश कांबळे, दीपक कांबळे, सुरज कामत, बच्चन कांबळे, तुषार भास्कर, दीपक कांबळे, राहुल कांबळे, सागर दावने आदी प्रमुख उपस्थित होते.
“घरकुलांचे मंजुरीपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांची नावे अशी,,,,,”
उज्वल देऊ बल्लाळ, धैर्यशील मारुती कांबळे, संजय जंबू कानडे, रेखा अशोक सोनुले, हनुमंत चंद्रभान पांडगळे, आशिष संजय सोनुले, राजा हनुमंत पांडगळे, शशिकांत तुकाराम घायतडक, राकेश राजाराम जाधव, राणी सदानंद हेगडे, प्रशांत शंकर प्रभाकर, सुमन महादेव धनवडे, रूपाली सुहास गाडेकर, पार्वती दत्तात्रय प्रभावळकर, अंकुश शहाजी नागरपोळे, दिपक बाळकृष्ण घोडके, दिपाली जतीनराव जगताप, प्रकाश भास्कर कांबळे, करण अशोक सकट, जितेंद्र गजानन प्रभावळकर, वैभव प्रवीण घस्ते, पमाबाई तिप्पाण्णा ऐवाळे, रुक्मिणी रामचंद्र सांगवडेकर, सतीश आनंदा कांबळे, रोहिणी उदय गाडेकर, शंकर गिरमल दावणे, योगिता संजय चव्हाण, दिगंबर विजय ऐवाळे, सौरभ सुरेश कांबळे, प्रकाश मारुती जाधव, उषा विष्णू कांबळे, शिवाजी बळवंत कवाळे, उमेश दशरथ गाडेकर, अरुण दिनकर गवळी, अशोक गुंडा दावणे, विद्या सागर दावणे, बाळासो शंकर हेगडे, प्रशांत सुधाकर सोनुले, कुमार तिप्पाण्णा ऐवाळे, विश्वास आनंदा सोनुले, रोहित आनंदा कांबळे, मारुती विष्णू हेगडे, अमोलिका मारुती जिरगे, सोनाली राजेश कल्ले, दिपक दिनकर सोनुले, सौरभ सुनील कांबळे, सुलभा संजय भोरे.