ताज्या बातम्यामहाराष्ट्र
देवरवाडीत श्री वैजनाथ देवाला अभिषेक

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
देवरवाडी तालुका चंदगड येथील श्री वैजनाथ देवाला कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करून चवथ्या श्रावण सोमवार निमित्त मंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला पूजा शंकर पुजारी,नागराज पुजारी यांनी बांधली होती यानंतर श्री वैजनाथ देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नारायण भोगण ,उपाध्यक्ष शशिकांत जाधव,सचिव बसवराज पुजारी ,वैजनाथ भोगण व सदस्य तसेच सर्व भाविक उपस्थित होते.