ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज तालुक्यातील कसबा हेब्बाळ नुल येथे साडेसात लाखांचा गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोठी कारवाई

कोल्हापुर  जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील कसबा हेब्बाळ नुल येथे उसाच्या फडात गांजाची झाडं लावल्याप्रकरणी गडहिंग्लज तालुक्यातील बाप लेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू सर्जाप्पा पिरापगोळ ऊर्फ कांबळे व काशाप्पा विष्णू पिरापगोळ ऊर्फ कांबळे (रा.हेब्बाळ कसबा नूल, ता.गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत.कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१६) सायंकाळी ही कारवाई केली. तब्बल साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दोन संशयीतांनी कारवाईच्या भितीने धुम ठोकली आहे. दरम्यान पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की विष्णू आणि काशाप्पा यांनी कसबा हेब्बाळ येथील आपल्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त बातमी स्थानीक गुन्हे अन्वेषणला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेच्या पथकाने हा छापा टाकला.

संबधित छाप्यात पिरापगोळ यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची ७ ते ८ फुट उंचीची ७५ झाडे मिळून आली. पोलीसांनी १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा ७ लाख ५७ हजार ५० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीत पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडेसो यांच्या नेतृत्वाखाली  पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कवळेकर यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली. तरी पोलिस नाईक महेश गवळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद केला असुन. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks