ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या ” श्री व्यापारी नागरी सह .पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड व मुरगूड परिसरातील अग्रगण्य आणि विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ते २०२८या कालावधीसाठी बिनविरोध करण्यात आली .निवडणूक निर्णय अधिकारी श्री .एस.एस. पाटील यानीं याबाबतचे पत्र पाठवून संस्थेला तसे कळविले आहे .

श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे – संचालक सर्वश्री . किशोर विष्णूपंत पोतदार ( मुरगूड ) , साताप्पा बापूसो पाटील ( यमगे ), प्रशांत जवाहर शहा (मुरगूड ), नामदेव  कृष्णाजी पाटील ,( मुरगूड ) , शशिकांत गुंडा दरेकर ( मुरगूड ) , प्रदिप दत्तात्रय वेसणेकर ( मुरगूड ) , निवास पांडूरंग कदम ( मुरगूड ) , धोंडीबा बाबालाल मकानदार (मुरगूड ), संदीप दत्तात्रय कांबळे ( मुरगूड ) , किरण विठ्ठल गवाणकर ( मुरगूड ) , प्रकाश धोंडीराम सणगर ( मुरगूड ) , सौ . रोहिणी शिवाजी तांबट ( मुरगूड ) , सौ . सुनंदा सुरेश जाधव ( मुरगूड ) .

श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झालेबद्द्ल-सभासद वर्गातून समाधान व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks