ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार संघातील सात जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये “शासन आपल्या दारी” उपक्रम प्रभावीपणे राबवू :आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलसह गडहिंग्लज व मुरगुड शहरातही स्वतंत्रपणे उपक्रम राबवु

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गेल्या ३०-३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो. यामधून ७० टक्केहून अधिक काम पूर्ण झालेलेच आहे. ऊर्वरीत तीस टक्के लाभ न मिळालेल्या नागरिकांपर्यंत या सर्व योजना पुन्हा नव्या जोमाने नेऊ.  “शासन जनतेच्या दारापर्यंत” कसे नेले जाते, हे राज्याला दाखवून देऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.आमदार श्री. मुश्रीफ बेळगुंदी ता. गडहिंग्लज येथे  पत्रकारांशी बोलत होते.

आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले,  शनिवार दि. २४  पासून या अभियानाला उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघापासून सुरुवात करणार आहोत. कागल गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सर्व म्हणजे १२४ गावांपर्यंत हा उपक्रम यशस्वी करू. कागल, गडहिंग्लज व  मुरगुड या तिन्ही शहरांच्या ठिकाणी स्वतंत्र हे अभियान राबवू. तसेच; दर आठवड्याला एक जिल्हा परिषद मतदार संघ याप्रमाणे कागल तालुक्यातील कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, नानीबाई चिखली, सेनापती कापशी, बिद्री- बोरवडे हे पाच जिल्हा परिषद मतदार संघ. गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव- गिजवणे व उत्तुर या जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघनिहाय हा उपक्रम स्वतंत्रपणे राबवू.

 हा उपक्रम राबविताना  २० लाखांपर्यंत खर्च आमदार फंडातून करता येणार आहे. त्यासाठीचे पत्र कालच जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांना दिल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले,  माझी आणि जनतेची नाळ अतूट आहे. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला कागल पंचायत समितीचा सभापती झालो. त्यावेळी “सभापती आपल्या दारी”, त्यानंतर आमदार झाल्यावर “आमदार आपल्या दारी” आणि नंतर “मंत्री आपल्या दारी” ही अभियाने यशस्वीपणे राबवली. त्या माध्यमातून निदर्शनास आलेल्या जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या मी जवळून बघितल्या. मंत्री पदाचा वापर जनतेसाठीच करीत मी अनेक जनताभिमुख योजना जन्माला घातल्या आणि समस्या  सोडवण्यामध्ये यशस्वी झालो.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks