शासनाच्या सर्व योजना पारदर्शीने जनतेपर्यंत पोहचवणार : राजे समरजितसिंह घाटगे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शासनाच्या योजना सर्व योजना पारदर्शीने जनतेपर्यंत पोहचवणार असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. मुरगुड येथील दत्ता देशमुख हाॅलमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप व महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर मागासवर्गीय साठी राखीव 20 टक्के सेसफंडातील योजनेतून सायकल वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांचे योजनांमध्ये विरोधकांनी गोरगरीब बांधकाम कामगाराकडून कमिशन खाल्ले. त्यांना देण्यात येणारे साहित्यही पूर्णपणे दिले नाही. शिंदे फडणवीस सरकारने नोंदणी फी केवळ एक रुपया केली तर घरकुल योजनेचे अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले. त्यांनी प्रशासनातही पारदर्शकता आणली. त्यांच्यामुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. कोणतेही पद नसताना राजे समरजितसिंह घाटगे सर्वसामान्यांसाठी तळमळीने अहोरात्र कष्ट घेत आहेत असे सर्वसामान्यांसाठी झटणा-या व विकासकामांसाठी निधी खेचून आणणाऱ्या समरजितसिंह घाटगेंना आमदार करुया.
कार्यक्रमास बिद्रीचे माजी उपाध्यक्ष सूनिलराज सूर्यवंशी,शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस , दत्तामामा खराडे ,वसंतराव पाटील,विजय राजिगरे,बजरंग सोनुले,डॉ.सात्तापा खंडागळे, छोटू चौगुले, विलास गुरव, सदाशिव गोधडे, राहुल खराडे, ,प्रवीण चौगले,संजय चौगले,उत्तम पाटील, राहुल मुरगूडकर, आदी उपस्थित होते
स्वागत दगडू शेणवी यांनी केले. प्रास्ताविक किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले.आभार सुशांत मांगोरे यांनी मानले.