इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पॅकिंगवर QR कोड प्रणाली आजपासून लागू ; मोदी सरकारचा मोठा निर्णय !

मोदी सरकारने देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठे बदल केले आहेत. कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पॅकिंगवर QR कोडची प्रणाली आजपासून लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अधिसूचनेच्या स्वरूपात जारी केली आहे.
यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या इलेकट्रोनिक्सच्या छोट्या पॅकची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. उत्पादन, आयात, वापर, तक्रार क्रमांक इत्यादी तपशील पॅकिंगवरील QR कोडमध्ये मिळणार आहे. याद्वारे, ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून त्याच्या खरेदी केलेल्या उत्पादनांशी संबंधित महत्त्वाची माहिती सहज मिळवू शकतील.
सरकारने पॅकेजिंगसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी QR कोडमध्ये माहिती देणे बंधनकारक केले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या नवीन नियमामुळे पारदर्शकता वाढेल, सबस्टँडर्ड/अविश्वासू आणि बनावट यांच्यावर कारवाई करणे देखील सोपे होईल.