ताज्या बातम्या
सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना 15 मे पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यात देण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पासून ते दिनांक 15 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
सदर आदेशाचा अंमल तात्काळ करणेचा आहे. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.