ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुळ संघाच्या दूध दर कपात संदर्भात मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलनाचा इशारा

गायीच्या दूध खरेदी दरातील कपातीला विरोध करत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक रस्ता रोको आंदोलन करत गोकुळ संघाचा निषेध व्यक्त केला आहे.यावेळी सर्व दूध उत्पादकांनी गोकुळ संघाच्या कार्यालयात गायी- म्हैशींसह मोर्चा काढण्याचा इशाराचा गांभीर्याने दखल न घेतल्यास व दूध दरामध्ये दर कपात रद्द न झाल्यास, आम्ही या मुद्द्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा देत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी व कागल विधानसभा मतदारसंघातील कडगाव व बिद्री चिलिंग सेंटरवर १४ ऑक्टोंबर रोजी मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यासंदर्भातील पत्र कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे मुख्याधिकारी गोडबोले यांच्याकडे निवेदन दिले,

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, मनसे जनाधिकार सेना जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे, कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे, भुदरगड मनसे जनाधिकार सेना अमित कोरे, राधानगरी तालुका संघटक प्रविण मनुगडे, सागर पाटील, सुरज वरोटे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks