ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : वेदगंगा नदीपात्रात आढळला ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड ता कागल येथील सूर्यवंशी कॉलनीतील नरेश दिलीप भंडारे (वय ३५) या युवकाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी वेदगंगा नदीमध्ये कुरणी बंधाऱ्याच्या नजीक आढळला. मयताच्या जवळ सापडलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख पटली.ड्रायव्हर व्यवसाय करणारा नरेश गेल्या रविवारपासून बेपत्ता होता. मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. घटनेची वर्दी गाव कामगार पोलीस पाटील सविता शिंदे यांनी मुरगूड पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी मुरगूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
कुरणी बंधाऱ्याजवळ शंकर रामगोंडा पाटील यांच्या मळी नावाच्या शेतालगत वेदगंगेच्या नदीपात्रामध्ये काठालगत मोटरीजवळ नरेशचा मृतदेह आढळला.अधिक तपास मुरगुड पोलीस स्टेशनचे पो.ना.४२४ रमेश शेंडगे करीत आहेत.