ताज्या बातम्यामहाराष्ट्र
HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवा ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भुदरगड तहसीलदारांना निवेदन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मोटार वाहन विभाग , महाराष्ट्र राज्य यांनी HSRP नंबर प्लेट बंधनकारक केले आहे.त्यासाठी ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख दिली आहे तसेच काही खाजगी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत.या नंबर प्लेट साठी ८०० ते ११०० रुपये इतका खर्च येत आहे.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जनते कडून तिप्पट पैसे वसूल केले जात आहेत.
या शुल्का मध्ये कपात करावी आणि नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवावी यासाठीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भुदरगड तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष मेंगाणे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मानसिंग देसाई , जिल्हा सरचिटणीस के के भारतीय , भुदरगड तालुका अध्यक्ष धनराज चव्हाण , युवक अध्यक्ष ओंकार पाटील उपस्थित होते.