“पर्यावरण संवर्धन सायकल यात्रा” करणाऱ्या कु.प्रणाली चिकटेचे कोल्हापुरात ओंकार होंडा सर्व्हिस,निसर्ग मित्र चलो ,रायगड सायकल प्रेमी, शाहू युथ फाऊंडेशन यांच्या वतीने वृक्ष संवर्धन हे पुस्तक देऊन केले स्वागत

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पर्यावरण संवर्धनासाठी फक्त चर्चा नको कृती करूया, सामाजिक कार्य करण्याची इच्छा जर तुमची असेल तर कोणत्याही परिस्थिती मध्ये ती पूर्ण होते फक्त हेतू स्वच्छ हवा. अशीच एक युवती कुमारी प्रणाली विठ्ठल चिकटे रा यवतमाळ ही एकटी मुलगी स्वखर्चातून निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेऊन तब्बल सात महिने व 8780 किलोमीटर चा सायकल प्रवास करत तिची “पर्यावरण संवर्धन सायकल यात्रा”कोल्हापूर मध्ये दाखल झाली तिचा एकच उद्देश आहे कि निसर्ग वाचेल तर आपण वाचू ही एकटी मुलगी पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत असेल तर आपणही तिच्या कार्याला सलाम करून तिने सांगितलेल्या पंचसूत्री चे पालन करून तिच्या कार्याला सपोर्ट करणार आहेत.
कोल्हापूर मध्ये आज तिचे स्वागत ओंकार होंडा सर्विस, निसर्ग मित्र चलो ,रायगड सायकल प्रेमी, शाहू युथ फाऊंडेशन यांच्या वतीने वृक्ष वाटिका वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.