मंडलिक महाविद्यालयाच्या अमर पाटीलची राज्यस्तरीय आव्हान प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. अमर मारुती पाटील या पदवीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड शिवाजी विद्यापीठाकडून आव्हान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशिक्षण शिबिर 2023 साठी निवड झाली आहे.
हे राज्यस्तरीय अंतरविद्यापीठ शिबिर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने माननीय राज्यपाल महोदयांचे कार्यालय यांच्या मार्फत दिनांक 25 डिसेंबर 2023 ते 3 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होत आहे. या विशेष शिबिरामध्ये महाराष्ट्रातील 22 विद्यापीठांनी कडून राष्ट्रीय सेवा योजनेचे 1000 स्वयंसेवक सहभागी होत आहेत. एन डी आर एफ च्या अधिकाऱ्यांकडून आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि प्रशिक्षणाचे महत्वपूर्ण धडे या शिबिरातून शिबिरार्थीना दिलेजाणार आहेत.
अशा महत्त्वपूर्ण शिबिरासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. या निवडीबद्दल महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्याला या शिबिरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. टी एम पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ एम ए कोळी, प्रा.डी व्ही गोरे, प्रा. संजय हेरवाडे, महात्मा फुले ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा. टी एच सातपुते, प्रो. डॉ. शिवाजी होडगे, लेफ्टनंट प्रा. व्ही ए प्रधान, प्रा. सुशांत पाटील प्रा. रामचंद्र पाटील, नाईक दिलीप कांबळे उपस्थित होते.