खानापूर गावच्या गरजू लोकांना आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या जीवनावश्यक वस्तू

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्यातील खानापूर गावचे सुपुत्र व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल़्या खानापूर गावच्या कोरोना महामारीची झळ पोहोचलेल्या अनेक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व खानापूर गावचे सुपुत्र प्रविणसिंह सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली या जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.गेल्या मंत्रीमंडळात भाजपचे जेष्ट मंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी खानापूर गावचा अनेक विकासकामांच्या माध्यमातून कायापालट केल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांनी याप्रसंगी सांगीतले.
अडचणीच्या काळात चंद्रकांत दादा पाटील पाटील खानापूर ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंदकांत दादा पाटील यानी दिलेल्या खानापूर गावातील गरजु नागरीकाना दिलेल्या जिवानावश्यक वस्तुंचे वाटप सामाजिक कार्यकर्ते भुजंगराव मगदूम,संदीप पाटील, विद्या सावंत, सुजाता रेडेकर, तृप्ती पुजारी,शोभा मांगले,युवा नेतृत्व पार्थ सावंत, सुभाष पाटील,सुशांत मगदुम, सागर अशोक नाईक, एम बी चव्हाण, पी डी गुरव, सागर धोंडीराम नाईक, दत्ता पाटील, ए डी कांबळे, यशवंत कांबळे, धनाजी भोई, विनायक घरपणकर, स्वप्नील मांगले आदिंच्या हस्ते वाटप करण्यात आले.