करवीर तालुक्यात कलीगडे पिकांच्या काढणीची धांदल

सावरवाडी प्रतिनिधी :
उन्हाळा ऋतु मध्ये वाढत्या उष्यामुळे जनता हैराण होत आहे . वाढत्या महागाईच्या काळात थंडपिये यांचे दर न परवडणारे झाले आहेत .. ऊस पिकाला पर्याय पीक म्हणून शेतकरी कलिंगडे पीकांच्या उत्पादनाकडे वळला आहे . ऐन उन्हाळा ऋतु मध्ये करवीर तालुक्यात कलीगडे पिकांच्या काढणीची धांदल उडू लागली आहे .
यंदा कलीगडे पीकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे . ऐन उन्हाळ्यात कलीगडे फळांना मागणी वाढू लागल्याने ग्रामीण बाजारपेठेत कलीगडे फळांची विक्री जोपात होऊ लागली आहे . कमी कालावधीत जादा आर्थिक उत्पन्न देणारे पीक म्हणून ग्रामीण शेतकरी कलीगडे उत्पादनाकडे वळाला आहे .
कलीगडे फळे काढून ट्रॉलीच्या साह्याने ग्रामीण भागातील रस्ते , चौकाचौकात, ग्रामीण बाजारपेठेत गावोगावी विक्री होऊ लागली आहे . ग्रामीण ग्राहकांना माफक दरात कलीगडे फळे मिळू लागल्याने शहरी बाजारपेठेत कलीगडे फळांची टंचाई भासत आहे . ग्रामीण भागात दहा, वीस , तीस, पन्नास रुपयापर्यत दर्जेदार कलीगडे उपलब्ध होऊ लागल्याने शेतकऱ्यांना कलीगडे पीक आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरू लागले आहे .
ऊसाऐवजी कलीगडे पीकाकडे कल !
ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागतात .१८ ते १९ महिने ऊस पीकाची उचल होत नाही . त्यामुळे ऊस पीक परवडत नाही . कमी कालावधीत कलीगडे पीकातून जादा पैसे मिळू लागल्याने ऊसाऐवजी कलीगडे उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल आहे